क्राईम

ACB- दोन लाचखोर लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

लोकगर्जनान्यूज

बीड : प्रवास भत्ता धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवरून लाच मागणाऱ्या व धनादेश देण्यासाठी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या या दोन्ही लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( ACB ) बीडच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी दोन्ही लाचखोर लिपिकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुंदन अशोक गायकवाड ( प्रथम लिपिक, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय, उस्मानाबाद ), पोपट श्रीधर गरुड ( वरिष्ठ लिपिक, लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी, जि बीड ) असे लाचखोर आरोपींची नावे आहेत. यातील कुंदन गायकवाड याने तक्रारदार लोकसेवक 32 वर्षीय पुरुष यांचा प्रवास भत्ता 19 हजार 410 मंजूर करण्यासाठी फोनवरून 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच धनादेश देण्यासाठी पोपट गरुड याने 19 हजार 410 रकमेची 20 टक्के म्हणजे 3 हजार 882 रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड ( ACB ) यांच्याकडे तक्रार केली. पडताळणी करुन बीड युनिटने सापळा लावून पोपट श्रीधर गरुड यास 3 हजार 880 रुपयांची लाच स्वीकारताना लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी, जि बीड कार्यालयात पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. सदरील सापळा सोमवारी ( दि. 24 ) संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, .विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.बीड, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, संतोष राठोड , अमोल खरसाडे गणेश म्हेत्रे यांनी यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »