aaple sarkar mahadbt- महा डीबीटी योजना नियमित सुरू रहाणार; ‘तो’ व्हायरल पत्र फेक
लोकगर्जनान्यूज
बीड : महा डीबीटी शेतकरी योजनेसाठी 15 तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु तो पत्र खोटं ( fake ) असून माहा डिबीटी ( aaple sarkar mahadbt ) साइड नियमित सुरू रहाणार असून गरजे नुसार नियमित सोडत होणार असल्याचे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, कल्टीवेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, पाइप लाइन, ठिबक, तुषार सिंचन, शेततळे, प्लास्टिक, रोपवाटिका, फुल शेती यासह अनेक योजना शासनाकडून देण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज महा डीबीटी ( aaple sarkar mahadbt ) वेबसाईटवर करावा लागतो. परंतु काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामध्ये महा डीबीटी योजनेसाठी इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 मे पर्यंत अर्ज करावेत. यानंतर अर्ज भरणे बंद होणार असून, तीन महिने नंतर ही साइड बंद रहाणार असल्याचा दावा करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. याचा शेतकऱ्यांना त्रासही सहन करावा लागला. परंतु तो पत्र खोटं ( fake ) असल्याचे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले. तसेच महा डीबीटी योजनेसाठी 24 तास ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही योजना नियमित सुरू रहाणार आहे. गरजे नुसार नियमित सोडत सुरू रहाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार वरुन अथवा आपल्या सोयीनुसार शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन केले. हे अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in येथे शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करावेत.
दिलगीर आहोत
त्या व्हायरल पत्रानुसार लोकगर्जनान्यूज नेही शेतकऱ्यांनो महा डीबीटी योजनांचा लाभ घेण्यासाठी 7 दिवस शिल्लक अशी बातमी प्रसिद्ध झाली. त्या पत्रा बाबतीत आम्ही कृषी विभागाच्या एका जबाबदार कर्मचाऱ्याशी संपर्क करुन चौकशी केली. त्यांनीही तो पत्र खरं असल्याचा दुजोरा दिला. त्यामुळे आम्ही बातमी प्रसिद्ध केली. परंतु आता तो पत्र फेक असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले. आमच्या बातमीमुळे अनेकांची धावपळ व गैरसोय झाली. या बद्दल लोकगर्जनान्यूज दिलगीर आहे.