आपला जिल्हा

अंबाजोगाईत हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अंबाजोगाई : शहरातील जोगाईवाडी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

या बाबतची माहिती अशी की, दि. १४ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई शहर पोलीसांना माहिती मिळाली की, शहरातील जोगाईवाडी परिसरात नितिन नरसिंगे व बलभिम कदम हे दोघे हातात तलवार आणि चाकू यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करीत आहेत. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत चादर यांनी त्यांचे सोबत पोलीस हवालदार लोमटे, वाहन चालक पोलीस हवालदार पठाण, पोलीस नाईक वाघमारे आणि पोलीस कॉन्स्टेबल गिते यांना सोबत घेऊन जोगाईवाडी येथे गेले. त्यावेळी त्या दोघा पैकी एकाच्या हातात तलवार तर दुसऱ्याच्या हातात चाकू होता. पोलीसांनी अत्यंत चपळाईने आणि सावधपणे त्यांना घेराव घालून अलदग त्यांना ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या. दोन पंचा समक्ष नितीन नरसिंगे याच्या हातातील स्टीलची मुठ असलेली लोखंडी धातुची स्टील पॉलीश असलेली एक साईडने धारदार असलेली व त्यास लाल कलरची मँन असलेली तलवार तर बलभीम कदम याच्या हातातील एक स्टिलचि मुठ असलेला १२ ईंच लांब पाते असलेला एक साईडने धारधार स्टिल पॉलिश केलेला सुरा असे शस्त्र जप्त केले.
पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत चादर यांच्या फिर्यादी वरून बालासाहेब नरसिंगे व बलभीम कदम यांच्या विरुद्ध दि. १५ फेब्रुवारी रोजी गु. र. नं. ५१/२०२३ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम २५ आणि ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button