आपला जिल्हा
खळबळजनक! बीड नगरपरिषदेच्या छतावर कर्मचाऱ्याची आत्महत्या

लोकगर्जनान्यूज
बीड : येथील नगरपरिषदेच्या वसुली विभागातील एका ४४ वर्षीय कर्मचाऱ्याने नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर लोखंडी शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
अविनाश धांडे (वय ४४ वर्ष) रा. बीड असे मयताचे नाव असून, त्यांनी नगरपरिषद इमारतीच्या छतावर एका लोखंडी शिडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे. तर रात्री येथे पाहाणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. पण आत्महत्या का केली हे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु नगरपरिषद कार्यालयातच आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.