शिक्षण संस्कृती

टीईटी (TET) परीक्षेचे हॉलतिकीट आज पासून ऑनलाईन उपलब्ध

लोकगर्जनान्यूज

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) येत्या २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी परीक्षार्थींचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) आज सोमवार (दि.१०) पासून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाले आहेत. यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संकेतस्थळावर जाऊन ते डाऊनलोड करुन त्याची झेरॉक्स ( Xerox) काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दि. १० नोव्हेंबर पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व परीक्षार्थींना प्रवेशपत्राची (हॉलतिकीट) प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार पासून (दि. २३) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र विहीत मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित परीक्षार्थींची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे टीईटी (TET) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनी आपले हॉलतिकीट काढून घेणं आवश्यक आहे.

5 Comments

Leave a Reply to Ankita Rajebhau Shinde Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button