मोठी बातमी! बीड जिल्ह्यातील येथील निवडणूक रद्द; कारण काय?

लोकगर्जनान्यूज
बीड : राज्यासह जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. जोरदार प्रचार सुरू असून, बुधवारी (दि.२६) चिन्ह वाटप ही झाले. मात्र बुधवारी गेवराई शहरातील प्रभाग क्रमांक ११ च्या उमेदवार दुरदाना बेगम सलीमोद्दीन फारुकी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे या प्रभाग ११ ची निवडणूक पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अ.प. पक्षाच्या गेवराई नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग ११ मधून दुरदाना बेगम सलीमोद्दीन फारुकी या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या पण त्यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक ११ ची निवडणूक रद्द केली. तसेच धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर आणि नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील ही उमेदवारांचे निधन झाल्याने असे राज्यातील तीन जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रभागाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. पुढील आदेश आल्यानंतर या प्रभागाच्या निवडणुका होतील. इतर प्रभाग आणि अध्यक्षपादाच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होतील.