आपला जिल्हा

अंबाजोगाईत लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी २५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. त्यास जालना येथील एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

एका पतसंस्थेच्या विरोधात तक्रार होती ती तक्रार निकाली काढण्यासाठी सहकार अधिकारी भंडारी याने ५० हजारांची लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित संस्थेच्या सचिवाने जालना येथील एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केली होती. याची खात्री करुन आज सोमवारी (दि.२) दुपारी जालना एसीबी पथकाने सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला असता या सापळ्यात भंडारी हा २५ हजार रुपये घेताना अलगद अडकला, याबाबत अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button