लोकगर्जनान्यूज
माजलगाव : वैयक्तिक लाभाच्या विहिरीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना जलसिंचन विभागातील कारकून एसीबीच्या ACB जाळ्यात अडकला आहे. हा सापळा बीड एसीबी पथकाने माजलगावात यशस्वी केला. लाचखोर कारकूनावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेख वसीम शेख शफीक असे लाचखोर कारकूनाचे नाव आहे. या कारकूनाने तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे गोठेवाडी ( ता. माजलगाव ) येथे शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विहिरीसाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजार 500 रु. लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 3 हजार देण्याचं ठरलं. ही ठरलेली रक्कम शुक्रवारी ( दि. 23 ) दुपारी केसापुरी कॅम्प फुले पिंपळगाव चौकातील एका हॉटेलसमोर रस्त्यावर लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ACB कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.