आपला जिल्हाकृषी

25%पीकविमा अग्रीम प्रश्नी वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

अंबाजोगाई : प्रधानमंत्री पिक विमा योजना हंगाम 2022 अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान जोखमीच्या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी बीड यांनी दि.9 सप्टेंबर 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या अधिसूचनेत अंबाजोगाई तालुक्यातील फक्त घाटनांदूर आणि अंबाजोगाई महसूल मंडळ सोयाबीन पीकविमा नुकसान भरपाई साठी निश्चित केले आहे. तालुक्यातील वगळलेल्या महसूल मंडळातील सोयाबीन ,उडीद, मूग,उत्पादक शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासुन वंचित राहणार आहेत.सरसकट पीकविमा,अनुदान मंजूर करण्यासाठी
शेतकरी आक्रमक झाले असून मंगळवारी दि.13रोजी तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त घट असणाऱ्या महसूल मंडळात 25 टक्के मर्यादा पर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय संयुक्त समिती यांचे मार्फत दिनांक 9 सप्टेंबर रोजी निर्गमित केली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण 62 महसूल मंडळापैकी फक्त 16 महसूल मंडळातच सरासरी उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट दाखवण्यात आली आहे.मात्र वास्तविक पाहता जिल्ह्यातील इतर सर्वच महसूल मंडळात सतत पावसाने दिलेल्या दडीमुळे फुलगळ व शेंगगळ होऊन सोयाबीन उत्पादनात घट आली आहे.बजाज पिक विमा कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनातील मोठे महसूलअधिकारी यांनी संगनमत करून शेतकऱ्यांचे नुकसान दाखवले नाही. परिणामी जिल्हास्तरीय संयुक्त समितीने चुकीचे व खोटे अहवाल ग्राहय धरून सदरची अधिसूचना प्रसिद्ध केल्याने जिल्ह्यातील इतर महसूल मंडळात शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे याबाबत वंचित बहुजन आघाडी वतीने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना निवेदन दिले व येणाऱ्या आठ दिवसात वंचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग ,उडीद उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा सरसकट देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली . या वेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण, जेष्ठ नेते मारुती सरवदे, रामराजे सरवदे, बळीराम सरवदे, प्रसिद्धी प्रमुख सुशांत धवारे,अक्षय भूंबे, युवा तालुकाध्यक्ष अनिल कांबळे, महादेव साखरे, बालाजी शेळके, रमेश स्वामी, सुभाष उगले, संभाजी घोरपडे,धानोरा चे नवनाथ हातागळे, सनगावचे उबाळे, भिवराव भुरे, शिवाजी देशमुख, नामदेव जामदार,परमेश्वर सरवदे आकाश ओव्हाळ, दयानंद सरवदे,बाबुराव तोडकर, गोविंद उगले आदींसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »