आपला जिल्हा

10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम जारी

लोकगर्जनान्यूज

बीड : जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक 12 वीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी,. 2023 ते 21 मार्च 2023 आणि इयत्ता 10 वी ची परिक्षा दि. 2 मार्च 2023 ते 25 मार्च, 2023 मध्ये या कालावधीत होत असून चालू वर्षी मंडळाच्या वतीने 12 वीच्या 101 व 10 वीच्या 156 परिक्षा केंद्रावर जिल्हयात परिक्षा होणार आहेत 15 ठिकाणी परिरक्षक केंद्र आहेत. परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडच्या जिल्हादंडाधिकारी दिपा मुधोळ,मुडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये परीक्षा केद्राच्या व परिक्षासाहित्य केंद्राच्या परिसरामध्ये 50 मिटर अतरामध्ये परिसरात दि. 21 फेब्रुवारी, 2023 ते 25 मार्च, 2023 पर्यंत परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश जारी केले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी केला असून परीक्षा केंद्राच्या परिसरात 50 मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्ये पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यवतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, घोषणाबाजी,सभा घेण्यास फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण, संदेश वहन साधने तसेच कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास, एस.टी.डी,आय.एस.डी मशिन, ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.दि. 21 फेब्रुवारी 2023 ते दि. 25 मार्च 2023 या कालावधीत दररोज परिक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदर पासून ते परिक्षा संपेपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर एक तास आधी पासून144 (2) सी.आर.पी.सी. अन्वये आदेश लागू केले आहे.

हे आदेश परिक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही. परिक्षा केद्राबाहेर व परिसरात परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचारी व परिक्षार्थी यांना वगळून दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परिक्षा केद्रांच्या शहरातील सर्व झेराक्स केंद्र, फॅक्स केंद्र व ध्वनी क्षेपक ईत्यादी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधीपासून ते पेपर संपेपर्यंतच्या कालावधीपर्यंत चालू ठेवण्याण्या प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय व परिक्षेसंबंधित कर्मचा-यांच्या व विद्यार्थ्यांच्या वाहनाव्यतिरिक्त इतर अनाधिकृत वाहनांना परिक्षा केंद्राच्या 200 मिटर परिसरात येण्यास प्रतिंध करण्यात आला आहे. हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास , मयताची अत्यंयात्रासाठी लागू राहणार नाहीत हे आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीतील परीक्षा केंद्रावर दि. 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधित त्या त्या दिवशीच्या परिक्षेच्या वेळेच्या एक तास आधी परीक्षा पेपर संपेपर्यंतच्या कालावधीत साहित्य ठेवलेल्या ठिकाणी कायम लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »