10 वी परीक्षेत आडसमध्ये मुलांनी मारली बाजी
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 93.93 टक्के निकाल
लोकगर्जनान्यूज
आडस : इयत्ता 10 बोर्डच्या परीक्षेचा शुक्रवारी निकाल लागला. यामध्ये राज्यात मुलींनी बाजी मारली परंतु येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावून मुलांनी बाजी मारली तर तृतीय क्रमांक पटकावत मुलींनीही वर्चस्व कायम राखलं आहे. शाळेचा एकूण निकाल 93.93 टक्के लागला आहे.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस ( ता. केज ) शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. शुक्रवारी ( दि. २ ) इयत्ता 10 बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये शाळेचा 93.93 टक्के निकाल लागला आहे. शाळेचे एकूण 165 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 155 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्य श्रेणीत 71, प्रथमश्रेणी 59, तृतीय श्रेणी 4 असे विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेतून 93 टक्के मार्क घेऊन नेटके अमित कारभारी, पांचाळ आदिनाथ महादेव या दोघांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेख शोयब अख्तर याने 91.60 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर शेख मसीरा रशीद आणि आकुसकर गौरी संजय या दोघींनी 91 टक्के गुण मिळवून दोघींनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव रमेश आडसकर, अर्चना आडसकर, ऋषिकेश आडसकर, मुख्याध्यापक बी.एस. सोळंके, उपमुख्याध्यापक एस.व्ही. आकुसकर, राजेश देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.