आपला जिल्हा
९ तालुक्यात कोरोना शुन्य
अंबाजोगाई ३, आष्टी १
बीड
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असून आज प्राप्त अहवाल जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरले आहे. एकूण ११०१ संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील १०९७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असून केवळ ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यातील ३ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यातील तर १ आष्टी तालुक्यातील असे दोन तालुक्यातील ४ रुग्ण आहेत. ९ तालुके शुन्य वर आहेत.