क्राईम

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना… मुलीला फोन वरून माहिती देऊन शेतकरी बापाने संपवलं आयुष्य

वडवणी : गिताजंली तुझा बाप कर्जबाजारी झालाय , कर्जफेडू शकत नसल्याने जगणं असहाय्य झालंय … शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतोय … लवकर मातीला ये … असं सासरी असणाऱ्या लेकीला मोबाईलवर सांगून कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी बापाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे आज उघडकीस आली.

बालासाहेब लक्ष्मण गोंडे ( रा. चिंचोटी ता. वडवणी ) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच नाव असून पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे अंदाजे दिड एकर शेती आहे . मंगळवारी ( दि. १४ ) रात्री ९ च्या सुमारास घरातील मंडळींना शेतात चाललो, गोठ्यावरच झोपणार असल्याचे म्हणून बालासाहेब शेतात गेले. आज बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास नादलगांव येथे दिलेल्या मुलीला मोबाईल वरून फोन करुन गिताजंली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे , घेतलेले कर्ज फेडू शकत नाही , शेतातील पिक देखील यंदा आले नाही संपूर्ण पिक वाया गेले . यामूळे मी खूप खचून गेलो आहे.आता तू सासर वरुन लवकर निघ , मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे . असं म्हणताच मोबाईल वरील संभाषण कट झाले . लगेच गिताजंली या मुलीने चुलत भाऊ कालीदास रामकिसन गोंडे यांना फोन करुन बापाने सांगितलेली हकीकत सांगितली आणि तुम्ही लवकर शेतात जा अन्यथा अनर्थ घडू शकतो असं म्हणाली.कालीदास यांनी शेता जवळ असलेला पुतण्या युवराज दिलीप गोंडे यांना फोन करुन बालासाहेब गोंडे यांच्या शेतात जा , ते आत्महत्या करत आहेत असं म्हणत मुलीला फोनवर बोलला असल्याचे सांगितले. गांभीर्य ओळखून युवराज गोंडे यांनी शेताकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला. बालासाहेब लक्ष्मणन गोंडे हे दोरीच्या सहाय्याने बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची माहिती नातेवाईकांना व गावातील नागरीकांना होताच हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेतकरी बालासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी , आई – वडील , अविवाहित एक मुलगी व दोन विवाहित मुलीसह 10 वर्षाचा एक मुलगा असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »