ह्रदयद्रावक! ..त्या … अपघातातील तिसऱ्या जखमीचा मृत्यू
लोकगर्जाना न्यूज
केज : तालुक्यातील कोरेगाव पाटी जवळ घडलेल्या बस व दुचाकी अपघातात तिघे गंभीर जखमी होते. उपचारादरम्यान यातील दोघांचा मृत्यू झाला. तिसऱ्या जखमीला उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले होते परंतु त्यांचाही मृत्यू झाला. या अपघातात तिघेही ठार झाले आहेत.
आज शनिवारी ( दि. २४ ) दुपारच्या सुमारास बन्सल क्लासेसची बस आणि दुचाकीचा केज-बीड रस्त्यावर कोरेगाव फाट्यावर भीषण अपघात झाला. यामध्ये भागवत कल्याण पवार, दिपक कल्याण पवार दोघे रा. कोरेगाव ( ता. केज ), सुनील मधुकर शिंदे रा. पिंपळगाव ( ता. केज ) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सुनील मधुकर शिंदे यांचा केज येथे मृत्यू झाला. दुसरा जखमी दिपक पवार यांचा अंबाजोगाई येथे मृत्यू झाला. तिसरे जखमी भागवत पवार यांनाही डोक्याला व छातीला मार असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे भागवत पवार यांना लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. लातूर येथेच भागवत पवार यांची प्राणज्योत मालवली आहे. या अपघातातील तिघांचं मृत्यू झाला.