ह्रदयद्रावक! अंबाजोगाईत तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची झुंज सुरू

अंबाजोगाई : येथील एका कुंटबाला अन्नातून विषबाधा झाल्याने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती चिंताजनक असल्याने झुंज सुरू आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बागझरी येथे घडली आहे.
श्रावणी काशीनाथ धारसुरे ( वय ४ वर्ष ), साधना काशीनाथ धारसुरे ( यव ६ वर्षं ), नारायण काशीनाथ धारसुरे ( वय ८ महिने ) असे मयत चिमुकल्यांची नाव असून आई भाग्यश्री धुरसरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री जेवण करून झोपी गेल्यानंतर सकाळी मळमळ व उलट्या होऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. मयतांचा पिता काशीनाथ दत्तु धुरसरे यांनी सर्वांना तातडीने उपचारासाठी येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान नारायण, श्रावणी, साधना यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेने धारसुरे कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विष बाधा झाली असावी असा अंदाज काशीनाथ धारसुरे यांनी व्यक्त केला आहे.