प्रादेशिक

हो हे खरं आहे? एका मांजरीमुळे १०० कोटींचे नुकसान अन् ६० हजार नागरिकांची तारांबळ!

 

लोकगर्जना न्यूज

आपण नेहमी मुंगी आणि हत्तीची आख्यायिका अथवा एक गोष्ट म्हणा ऐकत आलोय मुंगीने हत्तीच्या कानात जाऊन चावा घेतला की, हत्ती मरतो? हे खरंय की, नाही हे माहीत नाही. परंतु ही गोष्ट प्रत्येकाने ऐकलेली असेल. याची आठवण होण्याचं करणही तसंच असून, पुणे येथील पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक अशी घटना समोर आली असून, एका मांजरीमुळे तब्बल १०० कोटींचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तसेच सकाळी ६ पासून वीजपुरवठा खंडित झाल्याने तब्बल ६० हजार ग्राहक अंधारात चाचपडत आहेत.

याबाबतीत वाहिन्यांनी बातमी प्रसारीत केली, पिंपरी चिंचवड मधील भोसरी महा पारेषणच्या हाय ट्रान्सफार्मर मध्ये आज बुधवारी ( दि. २३ ) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक एक मांजर घुसले व त्याचे होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु या घटनेने ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झालाने भोसरी, आकुर्डी, इंद्रायणी नगर, भोसरी एमआयडीसी या परिसरातील तब्बल ६० हजार मीटर धारकांचा वीजपुरवठा खंडित झाला. एमआयडीसी भागातील शेकडो कंपन्या दिवसभर बंद राहिल्याने हजारो कामगार ही बसून होते. कंपन्या बंद असल्याने तब्बल १०० कोटींचे नुकसान झाले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच वीजपुरवठा लवकर सुरळीत नाही झाला तर यात वाढ होऊ शकते. सकाळ पासून वीजपुरवठा बंद असल्याने या भागातील नागरिक अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. बारा तास होऊन गेले तरी वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता परंतु काही भागात वीजपुरवठा चालू झाल्याचं सांगितलं जात आहे. चिंचवड येथून वीजपुरवठा जोडून पर्यायी व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तरीही मात्र या पुर्ण भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवार उजाडेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे कधी कोण? कसा भारी पडेल हे सांगता येत नाही हे या घटनेवरुन दिसून येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »