भवताली
होळ येथील गावअंतर्गत रस्त्याचा प्रश्न सोडविणार-खा.डॉ.प्रीतम मुंडे
धनराज लाटे यांच्या परिवर्तन गणेश मंडळाच्या श्रींची आरती
केज : होळ येथील गावअंतर्गत रस्त्याचा प्रश्न सोडविणार असून लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी दिली.
होळ (ता.केज) येथे त्यांच्या हस्ते परिवर्तन गणेश मंडळाच्या श्रींची आरती करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने खा.डॉ.प्रीतम मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच लक्ष्मण राख, माजी उपसभापती नेताजी शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच, परिवर्तन गणेश मंडळाच्यावतीने भाजपचे युवा नेते धनराज लाटे, शिवछत्रपती व्यायामशाळेचे सचिव मधुकर खाडे महाराज, संदीप खाडे, योगेश शिंदे, राम घुगे, मनीष मेंडके, पापा लोमटे, रवी घुगे, शाम घुगे यांच्यासह गणेश मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.