आपला जिल्हा
हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निधन; बीड पोलीस दल हळहळले
लोकगर्जनान्यूज
बीड : सेवा बजावताना अचानक छातीत दुखायला लागल्याने दवाखान्यात नेताना तीव्र हृदयविकाराचा धक्का आल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निधन झाल्याची घटना आज मंगळवारी ( दि. २३ ) घडली आहे. तरुण सहकारी गमावल्याने बीड पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
युवराज दामोदर राऊत ( वय ३५ वर्ष ) रा. नाळवंडी ( ता. बीड ) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आज सकाळी ते ड्युटीवर आले. यानंतर काही वेळाने युवराज यांच्या छातीत दुखायला लागले. तातडीने त्यांना उपचारासाठी बीड येथे घेऊन येताना रस्त्यातच प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने बीड पोलीस दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे.