हृदयद्रावक! नातेवाईकांना ज्याच्या लग्नाचं आमंत्रण त्याच्याच अंत्यविधीसाठी यावं लागलं
लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले असताना हृदय विकाराने केला घात
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : १८ तारखेला एकुलत्या एक मुलाचे लग्न असल्याने घरात आनंदाने तयारी सुरू होती.नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण दिले गेले,पण वर असलेल्या तरुणाला हृदय विकाराचा धक्का आला आणि यात त्याचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना अंबाजोगाई येथे घडली. ज्याच्या लग्नाचं आमंत्रण मिळाले त्याच्याच अंत्यविधीसाठी यावं लागण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली. लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळा आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील बँक कॉलनी परिसरात आपेगाव येथील तट कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुली, एक मुलगा असे तीन अपत्ये आहेत. स्थापत्य अभियंता असलेल्या मुलाचे धीरज वसंत तट ( वय २६ वर्ष ) रा. आपेगाव ( ता. अंबाजोगाई ) असे नाव आहे. या एकुलत्या एक मुलाचे लग्न जमलं होतं. लग्नाचं मुहूर्त १८ डिसेंबर ठरलं होतं. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घरात लगीन घाई सुरू झाली. सर्वजण आनंदात होते. काही नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण पोचले होते. परंतु नियतीला काही औरच मान्य होत. धीरज यांना जोरदार अटॅक ( हृदय विकाराचा धक्का) आला यातच मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. धीरज तट यांच्या पार्थिवावर आपेगाव येथे मुळगावी अंत्यविधी करण्यात आला.