हृदयद्रावक! त्या जवानाचा मृतदेह हाती लागला
लोकगर्जना न्यूज
माजलगाव : डॉक्टर फपाळ यांचा शोध घेताना बेपत्ता झालेला जवानाला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्या जवानाचा मृतदेह हाती लागला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळीच कोल्हापूर येथून आलेल्या या बचाव पथकाने शोध कार्य सुरू केले. दरम्यान दोन जवान मासेमारी साठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकले. यातील एकास तातडीने काढण्यात यश आले. परंतु एक जवान बुडाल्याने त्यांचा शोध सुरू होता. अनेक प्रयत्न केल्यानंतर त्या जवानाला शोधण्यात आले. पाण्याच्या बाहेर काढून तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. दवाखान्यात डॉक्टरांनी तपासणी करून मयत झाल्याचे घोषित केले. प्रयत्न निष्फळ ठरले असल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते. राजशेखर प्रकाश मोरे असे मयत जवानाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
——————————-
जिल्हाधिकारी उतरले धरणात
डॉ. फपाळ यांना शोधण्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील बचाव कार्य पथकातील जवान पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे स्वतः बोटीत बसून बचाव कार्यासाठी धरणात उतरून जवानाचे मनोबल वाढविले. सध्या ही प्रशासन धरणावर तळ ठोकून आहे. डॉक्टर फपाळ यांना शोधण्याचे कार्य सुरू आहे.