क्राईम

हृदयद्रावक! कार दुचाकी अपघातात बापलेक ठार; बीड जिल्ह्यातील घटना

लोकगर्जना न्यूज

बीड : दुचाकीवर आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जाताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत बापलेक जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज शुक्रवारी ( दि. २ ) सकाळी ८ च्या सुमारास आष्टी तालुक्यात घडली आहे. एकाच वेळी घरातील दोन्ही कमावते व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आले.

सुरज अरुण औटी ( वय २७ वर्ष ) , अरुण बापुराव औटी ( वय ५५ वर्ष ) रा. नांदा ( ता. आष्टी ) असे मयतांची नावं आहेत. दोघेही बापलेक शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. आज शुक्रवारी सकाळी दोघेही दुचाकीवर अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी येथे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात होते. दरम्यान बारामती – पैठण रस्त्यावर खाकळवाडी येथील शिंदे वस्ती जवळ समोरुन आलेली भरधाव कार क्र. एम.एच. ०४ जी यू ९९६७ चालकाने दुचाकीला जोरात धडक दिली. धढक बस्ताच बापलेक दुचाकीवरून फेकले गेले. जबर मार लागून दोघांचाही मृत्यू झाला. रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी मदत करत जखमी कार चालकाला दवाखान्यात पाठवून दिले. तसेच पोलीसांना खबर दिली. माहिती मिळताच कडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची कारवाई सुरू केली. एकाचवेळी दोघेही बापलेक गेल्याने औटी कुटुंब उघड्यावर आले आहे तर गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »