प्रादेशिक
हुडहुडी आणखी तीन दिवस!
भारतीय हवामानशास्त्राच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आहे . यामध्ये हरयाणा , पंजाब , राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत याची तीव्रता आहे .
यामुळेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही थंडीच्या लाटे सारखी परिस्थिती आहे . यापुढे तीन दिवस या लाटेचा परिणाम राहणार असा अंदाज असून विदर्भ,उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा , मध्य महाराष्ट्रातील सरासरी किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन दिवस हुडहुडीचा सामना जनतेला करावं लागेल . उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील नंदुरबार , धुळे , जळगाव , नाशिक ,अमरावती , नागपूर , वर्धा , बुलडाणा , औरंगाबाद , जालना , परभणी , नांदेड , उस्मानाबाद सह आदी जिल्ह्यांत थंडीचा कडाका जाणवेल अशी शक्यता आहे .