हा विश्वास म्हत्वाचा! ज्ञानराधाच्या आडस शाखेत १११००० ठेवली ठेवी
लोकगर्जनान्यूज
आडस : अफवेमुळे अनेकजण पैसे काढत असताना आडस ( ता. केज ) येथील तरुण व्यापाऱ्याने ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी मध्ये १ लाख ११ हजारांची ठेवी ठेवली आहे. यामुळे हा विश्वास म्हत्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
कुटे ग्रुपच्या माध्यमातून उद्योगात गगनभरारी घेऊन बीड जिल्ह्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली. ऊसतोड मजूर पुरवणाऱ्या या जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना हक्काची रोजीरोटी देऊन सुटाबुटात तरुणांना आणण्याचे काम कुटे ग्रुपने केले. तसेच ग्रामीण भागातील शेकडो सुशिक्षित मुलींना नोकरी दिली असून मोठ्या मेट्रो सिटी मध्ये एखाद्या कंपनीत इतक्या मुली नसतील तेवढ्या मुली बीड येथील कुटे ग्रुपच्या कार्यालयात नोकरी करत आहेत. या मुलींना येण्याजाण्यासाठी घरा पासून ते कार्यालयापर्यंत बसची सेवा आहे. परंतु या ग्रुपच्या कार्यालयात मागील दोन दिवसांपासून आयकर विभागाची तपासणी सुरू आहे. याच तपासणीचा गैर फायदा घेत कुटे ग्रुपच्या मराठवाड्यातील पहिली समजली जाणारी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी बाबतीत अफवा पसरली की, पसरवली यामुळे या मल्टीस्टेटच्या ठेवीदार आणि ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. आपलं पैसे बुडेल की,काय? या संशयातून अनेक ग्राहकांनी ज्ञानराधाच्या सर्वच शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली. या सर्व ठेवीदारांना ज्ञानराधाने पैसे देणे सुरू केले. रोकड संपल्यानंतर आरटीजीएस च्या माध्यमातून त्यांना पैसे देण्यात येत आहे. हे चित्र जवळपास ज्ञानराधाच्या शाखेत दिसत आहे. आडस ( ता. केज ) येथील ज्ञानराधाच्या शाखेत ठेवीदारांनी गर्दी केली. त्यांची रक्कमही देण्याचे काम सुरू आहे. असे चित्र असतानाही सर्व ठेवीदार पैसे काढून घेत असताना आडस येथील तरुण व्यापारी किशोर माने यांनी येथील शाखेत शुक्रवारी ( दि. १३ ) १ लाख ११ हजार रुपये ठेवी जमा केली. अशा वेळी दाखवलेला हा विश्वास म्हत्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
विश्वाला तडा जाऊ देणार नाही; चिंता करु नका ठेवी सुरक्षित आहेत- चेअरमन सुरेश कुटे
ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी व कुटे ग्रुप या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. आयकर विभागाची तपासणी व ज्ञानराधाचा काही एक संबंध नाही. मागील १७ वर्षांपासून आपण ज्ञानराधावर विश्वास दाखवला आहे. या विश्वासास लॉकडाऊन व नोट बंदी या संकट काळात ज्ञानराधा पात्र ठरली असल्याची आठवण करुन देत या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येकाच्या ठेवी सुरक्षित असून नेहमी प्रमाणे सहकार्य करा. असे आवाहन ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे यांनी एक व्हिडिओ शेअर करत सर्व ठेवीदार व ग्राहकांना केले.