स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड का. महामंडळाचे कार्यालय बीडला करा – करुणा मुंडे
लोकगर्जनान्यूज
बीड : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय परळी ऐवजी बीड येथे करणे मजुरांच्या सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे सदरील कार्यालय बीडला करावं अशी मागणी शिवशक्ती सेनेच्या करुणा मुंडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शुक्रवारी ( दि. १७ ) रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतु याचे कार्यालय परळी येथे आहे. ते राज्यातील मजुरांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. त्याऐवजी सदरील कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी बीड येथे करावं ते ऊसतोड मजुरांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे सदरील कार्यालय बीड येथे कार्यान्वित करण्यात यावे अन्यथा शिवशक्ती सेना प्रणित ऊसतोड कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदरील निवेदनावर करुणा मुंडे आणि अजयकुमार देडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.