स्थानिक गुन्हे शाखेचे बीड शहरासह इतर ठिकाणी छापे; अनेक जुगाऱ्यांवर कारवाई
बीड : येथील स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील विविध भागात तसेच नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत जुगार, अवैध दारू अड्ड्यांवर छापे मारुन जुगार खेळणारे व खेळविणारे यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य, अवैध दारुचा साठा असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. सर्वांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
आज मंगळवारी ( दि. १७ ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारा कडून शहरातील काही भागात ऑनलाईन मटका, चक्री, अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून बीड बसस्थानक जवळ बालाजी ज्यूस सेंटर येथे छापा मारला असता येथे ऑनलाईन चक्री जूगार सुरू होता. खेळताना अजय अंकुश तावरे ( वय २२ वर्षे ) रा . तुळजाईनगर बालेपीर , सुर्य रमेश तावरे ( वय १८ वर्षे ) रा . तुळजाईनगर बालेपीर , आमोल अंकुश आमटे ( वय २५ वर्ष ) रा . खांडेपारगांव ता.जि. बीड, रामेश्वर प्रल्हाद लाटे ( वय ३८ वर्षे ) रा . ग्रामसेवक कॉलनी , बालेपीर, प्रभाकर दगडु आंधळे ( वय ४५ वर्षे ) रा . गुंदा वडगांव ता . जि . बीड, आनंद शेटे ( रा .बीड ) हे मिळून आले. यानंतर नवगण कॉलेज रोड घुंमरे कॉम्पलेक्स मधील गाळयात छापा टाकला येथे युवराज श्रीमंत सुस्कर ( वय 29 वर्षे ) रा . पिंगळेगल्ली बीड, हा मिळुन आला . तिसरा छापा कडबा मंडई पेठ बीड भागात पत्रयाचे शेड मध्ये मारला असता त्या ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगार खेळत असताना मोहमंद कैफ मोहमंद अबुबकर ( वय 19 वर्षे ) रा . बाबाचौक इस्लामपुरा, शहेबाज अमजद सय्यद ( वय 18 वर्षे ) रा . इस्लापुरा, उजेर मुजाहिद खान ( वय 18 वर्षे ) रा . भालदारपुरा बाबा चौक, शेख फय्याज अब्दुल सलाम ( वय 31 वर्षे ) रा . भालदारपुरा बाबा चौक मिळून आले . याच भागात चक्री जुगारावर चौथा छापा मारुन अक्षय दिपक राऊत ( वय 28 वर्षे ) रा . पिंगळेगल्ली हा मिळून आला. बीड शहरात चार ठिकाणी छापे मारुन एकुण बारा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा २ लाख ४३ हजार ८० रुपयाचा मुद्येमाल ताब्यात घेतला. पोलीस स्टेशन शिवाजीनगर, पेठ बीड येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे चार गुन्हे दाखल केले आहेत . यानंतर राजपुत गल्ली , हिरालाल चौक येथे छापा टाकून सावन गिरीधरसिंह परदेशी यास विनापरवाना देशी दारुची विक्री करताना रंगेहाथ पकडून १० हजार ६०० रुपायाची देशी जप्त केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तांदळवाडी घाट ता. बीड येथे तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता पत्र्याच्या शेड मध्ये बेकायदेशीर जुगार पत्यावर पैसे लावुन खेळत व खेळवीत असताना सुंदर भानुदास खोसे , बालासाहेब शेषराव काळे दोन्ही ( रा . तांदळवाडी ता . जि . बीड , बाळु सुंदर टेकडे , बाळासाहेब मारुती लहाने, पप्पु विश्वनाथ जगताप सर्व रा . अंधापुरी ता . जि बीड , बाळु सखाराम खाकरे रा . सावरगांव ता . जि.बीड मिळून आले . त्यांचे ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम एकूण १ लाख ७० हजार १५० रुपायाचा मुद्येमाल मिळाला . याच ठिकाणी अवैध दारू विक्री करण्यासाठी साठा करुन देशी,विदेशी दारू किंमत ५ हजार १४० रु. मुद्देमाल जप्त करुन दोन्ही प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील स्थानिक गुन्हे शाखेने केली.