स्थानिक कोष व्यापाऱ्यांनी वाढविले १०० रु. प्रति किलो भाव लोकगर्जना न्यूज पोर्टल बातमीचा परिणाम
आडस : रामनगर ( कर्नाटक ) येथील मार्केटला येथील शेतकऱ्यांच्या रेशीम कोषला प्रति किलो ७९८ रु. भाव मिळाल्याची बातमी लोकगर्जना न्यूज पोर्टलने बुधवारी ( दि. १५ ) केली होती. ती बातमी व्हायरल होताच स्थानिक कोष खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रति किलो १०० अशी दरवाढ केली. त्यामुळे रेशीम उत्पादकांचा फायदा होत असल्याने लोकगर्जना न्यूजचे आभार मानले जात आहे.
रेशीम कोषचे जवळपास महिनाभरापासून भाव वधारले आहेत. परंतु अंबाजोगाई, मुरुड, बीड सह काही ठिकाणचे व्यापारी ६५० रु. दराने कोष खरेदी करत होते. आडस परिसरातील काही शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी कर्नाटक राज्यातील रामनगर येथे गेले होते. त्यांचे कोष बुधवारी ( दि. १५ ) विक्री झाले. त्यांना ७५० ते ७९८ प्रति किलो असा विक्रमी भाव मिळाला. याची माहिती मिळताच लोकगर्जना न्यूजने ही बातमी केली. ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या बातमीच्या दणक्याने ताळ्यावर आलेल्या खाजगी व्यापाऱ्यांनी लागलीच प्रति किलो १०० दर वाढ केली. तसे मेसेज रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केले. अशी माहिती रेशीम उत्पादक शेतकरी अमृत लाड, लाडेवडगाव यांनी दिली. लोकगर्जनामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने आभार मानले.तसेच ही दरवाढ व्यापाऱ्यांनी केली असली तरी रेशीम कोषचे दर वाढतच असून आज ( दि. १७ ) चे रामनगर ( कर्नाटक ) येथील काही पावत्या शेअर झाल्या आहेत. त्यात ९०० रु. प्रति किलोने कोष विक्री झाले आहेत. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी कोष विकताना भावाची चौकशी करुन आपलं माल विकावा असे आवाहन करण्यात येत आहे.