स्तुत्य उपक्रम! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून शाळेला १५ हजाराची देणगी
लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील कुंबेफळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीतीने सामाजिक भान राखून गावातील शाळेला पंधरा हजाराची देणगी दिली. या स्तुत्य उपक्रमामुळे जयंती उत्सव समितीचे कौतुक करण्यात येत आहे.
जयंती म्हणजे डिजे लावणे व त्यासमोर नाचत राहाणे. अनावश्यक खर्च करणं असे चित्र निर्माण झाले आहे. परंतु यास कुंबेफळ ( ता. केज ) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अपवाद ठरली. या जयंती उत्सव समितीने अनावश्यक खर्चाला कात्री लावून जमा झालेली रक्कम योग्य ठिकाणी खर्च व्हावी असा निर्णय घेतला. रोख १५ हजार रुपये शनिवारी ( दि. २५ ) जिल्हा परिषद शाळा, कुंबेफळ मुख्याध्यापक यांच्या कडे देणगी दिली. या देणगीची माहिती मिळताच ही खरी आंबेडकरांच्या विचारांची जयंती असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत जयंती उत्सव समितीचे कौतुक करण्यात येत आहे.