सोहेल पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संघटक पदी निवड
वडवणी : तालुक्यातील चिंचवण येथील युवक कार्यकर्ते सोहेल महेबुब पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शनिवारी ( दि. २६ ) मान्यवरांच्या उपस्थितीत जयसिंग सोळंके यांच्या हस्ते देण्यात आले.
वडवणी तालुक्यातील सोहेल पटेल हे यापुर्वीच जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांचे संघटन कौशल्य व सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या मान्यतेने जिल्हा संघटक पदी सोहेल यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार व ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासासाठी भरीव कामगिरी कराल तसेच पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल अशी अपेक्षा निवड पत्रात व्यक्त करण्यात आली. जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल सोहेल महेबुब पटेल यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.