सोयाबीन ( soyabean ) दर घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा
विकावा की, ठेवावं या विचारात सोयाबीन घरातच पडून
लोकगर्जनान्यूज
बीड : ५ हजार ३०० रुपयांपर्यंत गेलेल्या सोयाबीन ( soyabean ) दरात मागील काही दिवसांपासून घसरण सुरू झाली. हे दर प्रतिक्विंटल ४ हजार ९३० पर्यंत खाली आले. यामुळे दरवाढतील या आशेने घरात ठेवलेलं सोयाबीन विकता येत नसल्याने यंदाही सोयाबीन ( soyabean ) उत्पादक शेतकऱ्यांची निराशाच झाल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन हे पीक मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असल्याने हे शेतकऱ्यांचे म्हत्वाचे पीक ठरले आहे. परंतु निसर्गाचा लहरीपणा व वाढती रोगराई पहाता उत्पादनात घट होत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ऐन वाढ होण्याच्या व फुले, शेंगा लागण्याच्या म्हत्वाच्या वेळी पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघतो की, नाही हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. परंतु नवीन सोयाबीन ( soyabean ) बाजारात येत असताना दर वाढ सुरू झाली. ४ हजार ८०० रु. गेलेले दर वाढत ५ हजार ३०० पर्यंत वाढत गेले. ही दरवाढ पहाता आणखी वाढ होईल म्हणून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. अनेकांनी सोयाबीन ( soyabean ) न विकता घरात ठेवले. परंतु काही दिवसांत पुन्हा दर घसरण्यास सुरू झाले. ५ हजारांपर्यंत स्थिर झाले. पुन्हा यात घसरण होऊन बुधवारी ( दि. ६ ) सोयाबीन ( soyabean ) ( प्लांट ) प्रक्रिया उद्योग लातूर येथील दर ५ हजार ९३० म्हणजे ५ हजारच्या आत आले. ही तफावत पहाता मागील आठ ते दहा दिवसांत सोयाबीन प्रतिक्विंटल ३०० रु. कमी झाले. यामुळे दर वाढण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची निराशाच झाल्याचे दिसून येत आहे. हे प्लांट चे दर असून बाजार समितीचे दर यापेक्षा काही प्रमाणात कमी असतात. यामुळे उत्पादनात घट तसेच दरही पडत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
तीन वर्षांपासून सोयाबीन ( soyabean ) घरात!
तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन ( soyabean ) विकल्यानंतर शेवटच्या टप्प्यात दर वाढ होऊन तब्बल ११ ते १२ हजार प्रतिक्विंटल पर्यंत सोयाबीनने विक्रमी अशी उसळी घेतली होती. परंतु यानंतर हंगामात दर घसरत ६ हजारांपर्यंत आल्याने तसेच दर वाढतील म्हणून काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही. गतवर्षीही असेच झाले अन् सरासरी ५ हजारांच्या वर दर गेले नाही म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन ( soyabean ) घरातच ठेवलं. यंदाही ५ हजार ३०० पर्यंत दर पोचल्याने ६ हजारांचा टप्पा गाठेल म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकता घरात ठेवले आहे. असे पहाता मोठ्या शेतकऱ्यांकडे तीन हंगामातील सोयाबीन घरात पडून आहे. परंतु ते विचार करत असलेले ६ हजार मॅजिक फिगर मिळेल की, नाही? हा प्रश्न आहे.