सोयाबीन भावाची चढ-उतार सुरुच भाव वाढले तरच आवक; शेतकऱ्यांनी बाजाराची दोरी ठेवली हाती
सोयाबीनचे भाव स्थिर रहातं नसून चढ-उतार सुरुच आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विकण्यास तयार नाही. बाजारात भाव वाढले तरच शेतकरी माल विक्रीसाठी आणत असल्याने भाव घसरले की, आवक मंदावते. त्यामुळे शेतकरी प्रथमच जागरुक दिसत आहे. त्यांनी बाजारभावाची दोरी आपल्या हातात ठेवल्याचं दिसत आहे. सध्या दर कमी होत असलेतरी अशीच जागरुकता शेतकऱ्यांनी दाखवली तर, सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
मागील महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. ७ हजारांपर्यंत गेलेले भाव पुन्हा घसरले असून मागील आठवड्यात ६४००-६५०० असलेले भाव या आठवड्यात सोमवार पासून घसरण्यास सुरुवात झाली. बुधवारी मीलचे भाव ६१०० ते ६३०० असे दिसून आले. या तुलनेत व्यापाऱ्यांचे भाव ५९०० ते ५८०० दिसून आले. दर वाढतील म्हणून घरातच साठवून ठेवलेले सोयाबीन आणि उन्हाळी सोयाबीन ही निघत असल्याने शेतकरी काहीशी चिंतेत आहेत. यात पुन्हा शासनाने सोयाबीन, हरभरा सह काही पिंंकाच्या सवदे बाजारावर बंदी घातली. याचा ही परिणाम असल्याने भाव दबले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु याचा स्थानिक बाजारावर काही जास्त परिणाम होणार नाही असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज जरी बाजारात भाव घसरत असल्याचे दिसून येतं आहे. परंतु आवक कमी झाली की, भाव नक्कीच वाढणार असा अंदाजही जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रथमच शेतकऱ्यांनी सोयाबीन भावा बाबतीत संयमी भूमिका घेत मालाची साठवणूक केली तोच संयम आणखी काही दिवस दाखवण्याची गरज आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झालेली असल्याने सरासरी ६५०० रु. पर्यंत सोयाबीन स्थिर राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शासन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही!
सोयापेंड, तेल आयात निर्णय असेल अथवा आताच घेतलेलं सोयाबीन, हरभरा वायदा बाजार बंदी निर्णय याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांकडून या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. वायदे बाजाराचा शेतकऱ्यांचा थेट संबंध येत नसला तरी त्यामुळे बाजारीची काय स्थिती आहे. दर कसे रहाणार याचा अंदाज येत होता. परंतु वायदे बाजारावर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांना दरच समजणार नाही. शासन एकीकडे शेतकऱ्यांचा खूप कळवळा दाखवत असून दुसरीकडे त्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही? असा आरोपही शेतकरी व शेतकरी नेत्यांकडून करण्यात येत आहे.