सोयाबीन दराच्या ‘रिव्हर्स गिअरने’ शेतकरी चिंताग्रस्त
संपूर्ण नुकसानभरपाई देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ तर अनुदानासाठी प्रशासनाचा वेळकाढूपणा
लोकगर्जनान्यूज
केज : सोयाबीनला थोडा फार चांगला भाव मिळेल आणि उत्पादन खर्च तरी निघेल या आशेने माळेगाव परिसरातील (ता केज) शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचे व या वर्षीच सोयाबीन घरात साठवून ठेवले.मात्र दराच्या सतत्याने रिव्हर्स गिअरने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असून,दराला लागलेल्या ग्रहणाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनला ५४०० ते ५६०० असा दर होता. मात्र आज रोजी दरात चारशे रुपयांची घट झाली.ते दर ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल इतके खाली येऊन ठेपले.सातत्याने घसरत्या दराने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे .सध्या आहे त्या दराने सोयाबीची विक्री करावी तर मोठा तोटा होतो, अन तसेच साठवून ठवावे तर भावही वाढत नाहीत. आता यापुढे कसे काय करावे ही द्विधामनःस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
यावर्षीचा हंगाम अनेक संकटांचा फेरा आला पेरणी ते काढणी कालावधीत सोयाबीन पिकावर सुरवातीला सततच्या रिमझिम पाऊस,गोगलगायचा उपद्रव यामुळे वाढ खुंटली त्यानंतर शेंगा पोसण्याच्या आवस्थेत पावसाचा मोठा खंड,पुन्हा तांबेरा,पिवळा मोझाक या रोगाचं प्रादुर्भाव आणि कढणीवेळी परतीच्या पाऊस सोयाबीन पीक मातीमोल करून गेला .एकून ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.ज्यां शेतकऱ्यांना थोडेबहुत हाती लागले आणि केलेला खर्च तरी निघेल या आशेने घरी साठवून ठेवले.परंतु या आशेवर सोयाबीन दराच्या सततच्या घसरणीने पाणी फेरले आहे.आशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी संसाराचा गाडा कसा ओढायचा? शेती कशी करायची?आशे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून शेतकरी अडचणीत आले आहेत.
पीक विमा देेण्यास कंपनीची टाळाटाळ तर अनुदानास प्रशासनाचा वेळकाढूपणा
कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टीने शेती पिकांच मोठे नुकसान झाले.चिंचोली महसूल मंडळात विमा कंपनीने नुकसानीच्या 25 टक्के अत्यल्प अग्रीम देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली.त्याचेेेही गणित जुळत नाही.त्यानंतर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण पीक नुकसानभरपाई देण्याचे बजाज अलंयन्स कंपनीला आदेश दिले असतानाही त्याला विमा कंपनीने केराची टोपली दाखवत नियम अटी बोट ठेवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अनुदान घोषित केले. मात्र ते शेतकऱ्यांना देण्यास प्रशासन वेळकाढूपणा करत असून घोडे कुठे अडले हे कळायला मार्ग नाही.
सोयाबीनचे भाव कमी होण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. आयात शुल्क कमी करून निर्यात शुल्क वाढ केली. आणि आतंरराष्ट्रीय बाजारातुन सोयपेंड घेण्यास मंजुरी दिली परिणामी भारतीय बाजारात सोयाबीनचे भाव घसरले .तसेच विमा कंपनीने ८० टक्के विमा शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावा आणि जिल्हा प्रशासनाने तसेच केज तालुक्यातील शेतकऱ्यांना आणेवारी प्रमाणे अनुदान तात्काळ वितरित करावे.”
कुलदीप करपे ,जिल्हाध्यक्ष.
स्वाभिमानी शेतकरी संघटना. बीड
‘मागील काही दिवसात सोयाबीनची आवक अतिशय कमी आहे .यापुढे भाव वाढतील की कमी होतील हे निश्चित सांगता येत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन माल विक्रीस काढावेत’.
राजाभाऊ लोकरे ,अडत व्यापारी