कृषी

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दराने घेतली उसळली

लोकगर्जनान्यूज

बीड : सोयाबीनचे घटते दर पाहून शेतकऱ्यांमध्ये चलबिचल होती. पण आज सोमवारी ५ हजार ९०० ते ६ हजार १०० पर्यंत वाढ झाली. सोयाबीन दराने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आवक वाढलेली असताना दरवाढ होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गतवर्षीचा विचार केला तर प्रथम ७ हजार ५०० ने खरेदी सुरू होऊन नंतर दर घसरत ५ हजार प्रतिक्विंटलच्या आत गेले. दरवाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकता घरातच ठेवलें आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या घरात गतवर्षीचे सोयाबीन पडून आहे. दरवाढ मात्र काही होत नव्हती हे चित्र पहाता नवीन सोयाबीनची आवक वाढली की, आणखी दर घसरतील असा अंदाज होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू होती. पण या दरम्यान शासनाने सोयाबीनचे स्टॉक लिमिट काढल्याचे वृत आले तसेच खाद्य तेलाचे व सोयापेंडचे ही दर वाढले असल्याचे वृत्त आहे. याचा परिणाम सोयाबीन बाजारावर दिसून आलं. तीन दिवसांपूर्वी लातूर एडीएम मीलचे दर ५४०० होते तर किर्तीचे ५७०० होते. दोन दिवसांत यामध्ये सुधारणा होत सोमवार ( दि. ७ ) लातूर एडीएम ( टीना ) मीलचे दर ५ हजार ९३० झाले. म्हणजे दोन दिवसांत ५३० रु. घसघशीत अशी वाढ झाली,तर किर्तीचे लातूर दर ६ हजार १०० असून ४०० रुपयांची दरवाढ आहे. ही दरवाढ पहाता सोयाबीन दराने उसळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नवीन सोयाबीनची चांगली आवक बाजारात सुरू झालेली आहे. तरीही दरवाढत असल्याने हे समाधान कारक चित्र दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरीही शेतकऱ्यांनी बाजारा बाबतीत जागरूक राहून व याबाबत अधिकाधिक तज्ञ व बाजार अभ्यासकांच्या संपर्कात राहून माहिती घेत माल विक्रीचा निर्णय घ्यावा असे मत जानकार व्यक्त करत आहेत. हे दर १ नंबर मालाचे असून ओलावा, माती, पावसाने खराब झालेले सोयाबीन पाहून काहीसा दरांमध्ये फरक पडू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »