क्राईम
सोनवळ्यात घरफोडी;दोघांवर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
सोनवळा ( ता. अंबाजोगाई ) येथे घरफोडून रोख रक्कमसह दागिने असा मिळून ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी दोन संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आडस पोलीस चौकी हद्दीतील सोनवळा ( ता. अंबाजोगाई ) येथील बालासाहेब पतंगे यांच्या घराचे चॅनलगेटचे कुलुप तोडून घरात घुसून चोरट्यांनी जर्मनच्या डब्यातील दिड तोळा सोन्याचे गंठण, कानातील झुंबर, चांदीचे भार दोन जोड एकूण किंमत ५४ हजार आणि रोख रक्कम ३० हजार असे एकूण ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. घटनेची माहिती मिळताच धारुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बालासाहेब श्रीधर पतंगे यांच्या फिर्यादीवरून धारुर पोलीस ठाण्यात भाठाणा येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद बासटे हे करत आहेत.