क्राईम

सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवावर अपहार केल्याचा गुन्हा दाखल

 

केज : कर्जदार सभासदा कडून रोख रक्कम जमा करून ती संस्थेच्या खात्यावर बँकेत जमा न केल्या प्रकरणी लेखा परीक्षकांच्या तक्रारी वरून सहकारी सोसायटीच्या सचिवावर १ लाख ४१ हजार रु चा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील टाकळी येथील सेवा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या आदेशानुसार लेखा परीक्षक नवाबोद्दीन काझी यांनी लेखा परीक्षण केले असता त्यांना असे आढळून आले की या सेवा सहकारी संस्थेचे सचिव एस. आर. वाघमारे यांनी  दि.१ एप्रिल २००९ ते दि. ३१ मार्च २०१० या कालावधीत २० हजार ७०० रु., दि.१ एप्रिल २०११ ते दि. ३१ मार्च २०१२ या कालावधीत १७ हजार ३०० रु., दि.१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ७३ हजार ३० रु. आणि दि.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत ३० हजार ३०५ रु. अशी एकूण १ लाख ४१ हजार ३३५ रु. हे कर्जदार सभासदांकडून पैसे जमा केले; परंतु ते संस्थेच्या खात्यात बँकेत जमा केले नाहीत. असे आढळून आले.

त्या बाबत त्यांनी अहवाल सादर केला आणि स्वतः दि. १८ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार केज पोलीस ठाण्यात सचिव एस. आर. वाघमारे यांच्या विरुद्ध गु. र. नं. १२४/२०२२ भा. दं. वि. ४०९ आणि ४२० नुसार फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »