लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील आसरडोह येथील तरूण सुरज तोडकर यांनी गावासाठी लोखंडी रॅक उपलब्ध करून देऊन रस्त्यावरील वाचनालय हा आगळा उपक्रम राबविण्यात आला. या वाचनालयाचा शुभारंभ आज शुक्रवारी ( दि. २४ ) सकाळी करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल सूरजने गावाला वाचनाचा ‘प्रकाश’ दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
आपल्या छोट्याशा गावात वृद्ध, विद्यार्थी, तरुण, शेतकरी सर्वांना शैक्षणिक,शेती, बाजारभाव आदि जगातील घडामोडीची माहिती मिळावी, या उद्देशाने सूरज तोडकर रा. आसरडोह ( ता. धारुर ) हा तरुण वॉटर प्रुफ ( water Proof ) ची कामे करतो . ही कामे सध्या मुंबई,पुणे येथेही करतो. गावासाठी काही तरी करायची इच्छा असल्याने त्यांनी स्वखर्चाने ग्रामपंचायत कार्यालय समोर लोखंडी रॅक उभा करुण रस्त्यावरील वाचणालय हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. येथे सर्व प्रकारचे वृत्तपत्र आणि शेती विषयक,तसेच मासिक व ईतर पुस्तक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या वाचणालयाचा शुक्रवारी ( दि. २४ ) जेष्ठ नागरिक राजेभाऊ देशमूख यांचे हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोपान काळे,नारायण तरकसे, बाजीराव गडदे,गणेश पिंगळे, प्रल्हाद शिंदे,ज्ञानोबा सामसे, विश्वनाथ तोडकर,सावन बावणे,सुरेश पिंगळे,रमेश देशमुख,उत्तमराव काळे,अमर गायकवाड,दगडु पाटोळे , आडस येथील गोविंद पाटील , ईसाक शेख आदी उपस्थित होते.