लोकगर्जनान्यूज
बीड : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे काही वेळात शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश करणार असू ते सध्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. या प्रवेशामुळे केज तालुक्यातील आडस ( बीड जिल्हा) चर्चेत आले असून आज सकाळपासून आडसच्या नागरिकांचे फोन खणखणत आहेत.
आडस येथील ॲड. वैजनाथ वाघमारे ( आडसकर ) हा बीड जिल्ह्यातील चेहरा रातोरात चर्चेत आला. त्याला कारणही तसेच असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांचे पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांना शिंदे गटाने गळ घातली असून ते शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. वैजनाथ वाघमारे यांनी स्वतः लोकगर्जनान्यूज वेब पोर्टलशी बोलताना दिली. हा प्रवेश घडवून सुषमा अंधारे यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रवेशामुळे मात्र बीड जिल्ह्यातील आडस ( ता. केज ) गाव चर्चेत आलं आहे. या बातम्या वाहिन्यांवर झळकताच आडस येथील नागरिकांचे फोन खणखणायला सुरू झाले. येणारं प्रत्येक फोनवर अंधारे आडसच्या आहेत का, त्यांचा पती कोण आहे, हेच विचारत आहेत.