सिताफळ (custard apple ) उत्पादन वाढ;जागतिक बाजारपेठ मार्गदर्शन अन् प्रशिक्षण
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे सह तज्ञ मार्गदर्शक उपस्थित रहाणार
लोकगर्जनान्यूज
केज : सिताफळांचा बहार धरण्याचा काळ असून हा या पिकासाठी म्हत्वाचा काळ आहे. सिताफळ ( custard apple ) उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादन वाढ व फळधारणा काळात घ्यावयाची काळजी याचे प्रशिक्षण, जागतिक बाजारपेठ विषयी मार्गदर्शन ( दि. १ ) जून तालुक्यातील कळमअंबा येथे रेणूका माता ( आईचा माळ ) मंदिर परिसरात पार पडणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या सह तज्ञ मार्गदर्शक लाभणार आहे. या प्रशिक्षणासाठी सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच शशिकांत इंगळे, मानवलोक कडून करण्यात आले.
सिताफळ ( custard apple ) या रानमेव्याची निसर्गाने मोठी देणगी दिली. अंबाजोगाई, धारुर, परळी, आष्टी, पाटोदा,बीड या तालुक्यातील डोंगरातील सिताफळांची चवच वेगळी आहे. धारुर होते तर एक सिताफळांचा ब्रॅण्ड आहे. सध्याचा हा सिताफळाचा बहार धरण्याचा काळ आहे. या काळात सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, हंगाम नियोजन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील जी आय ( GI ) मानांकित सिताफळ पिकास जागतिक बाजारपेठ आणि उत्तम प्रक्रिया केंद्र उभे करण्यासाठीचे प्रयत्न या बाबत महत्वाचे सत्र या प्रशिक्षणात होणार आहेत. हे प्रशिक्षण आशियाई विकास बँक अर्थसहाय्य, महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्कर ( मॅग्नेट ) आणि मानवलोक अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणारा उत्तम कृषी पद्धती ( GAP ) सिताफळ प्रशिक्षण “ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन” बाबतचे दुसरे प्रशिक्षण आहे. तसेच बीड जिल्ह्यातील सिताफळांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, सिताफळ उत्पादकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच बाबासाहेब जेजुरकर ( कृषी अधिकारी बीड, सुभाष साळवे ( प्रकल्प संचालक, आत्मा बीड ), महादेव बरडे, सुर्यकांत वडखेलकर, अनिकेत लोहिया उपस्थित रहाणार आहेत. या प्रशिक्षणासाठी सिताफळ ( custard apple ) बागायतदार शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मानवलोक व कळमअंबा ग्रामपंचायतीने केले आहे.