साळेगावच्या शंकर विद्यालयात डिजिटल वर्गाचे उदघाटन
आजपर्यंतच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या मेळावा पार पडला
लोकगर्जनान्यूज
केज : ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील मुलांप्रमाणे नवीन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस चे सतत प्रयत्न राहिलेले आहेत. संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमाची आखणी करण्याबद्दल आग्रही असतात,याच प्रेरणेतून शंकर विद्यालय साळेगाव येथील डिजिटल वर्ग सुरू करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रस्ताविक करताना मुख्याध्यापक देशमुख पी. एम. यांनी उपस्थितां समोर डिजिटल वर्ग करण्याची का ? गरज आहे याबद्दल सविस्तर विचार मांडले डिजिटल वर्ग करण्यामध्ये मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. या वर्गाचा उपयोग सर्व वर्गासाठी कशाप्रकारे होणार हे उपस्थितांना सांगितले. याचबरोबर शाळेचे माजी मुख्याध्यापक गदळे यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सर्वश्री राऊत आर एल,जाधव आर आर, ए व्ही चव्हाण, मस्के पी जी,पत्रकार गौतम बचुटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षकांच्या वतीने विचार व्यक्त करतात उपक्रमशील शिक्षक प्रताप केंद्रे यांनी सदर उपक्रमाची बांधणी कशा प्रकारे केली याचे सविस्तर विवेचन केले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने उपसरपंच गालफाडे गणेश मारीबा,लेखापरीक्षक गीते बाबासाहेब किशन, पालक गीते बिभीषण अचुतराव, ग्रामपंचायत सदस्य इंगळे रमेश मुरलीधर तसेच शाळेचे शिक्षक सर्वश्री तांबारे एस जी, म्हेत्रे जी एच, गीते आर एन,सय्यद अकबर पटेल, नखाते एच आर , म्हेत्रे के के, घोडके एस बी, केंद्रे पी एस,गालफाडे एस बी, मोटे आर ए, बोबडे एन एस, मुंडे बी बी, इ.उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीते आर एन यांनी केले तर आभार प्रदर्शन तांबरे एस जी यांनी करून कार्यक्रमाचा समारोप केला.