सायबर बदनामी पासून कसे वाचावे
पोस्टर्सच्या माध्यमातून बीड पोलीसांकडून जनजागृती
बीड : सायबर फसवणूकीसह बदनामीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये आर्थिक सह सन्मानाचे नुकसान होते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यापासून कसे वाचावं, त्यानंतर काय करावे? याबाबत बीड पोलीसांकडून फेसबुक, ट्विटरवर माहिती असणारे पोस्टर शेअर करत जनजागृती सुरू केली.
आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले आहे. या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर वाढला असून याचे फायदेही अनेक आहेत. परंतु नुकसान ही कमी नाहीत. परंतु सजग राहून फसवणूक व सायबर बदनामी पासून स्वतःला वाचवता येते. यासाठी पोलीस, सायबर सेल अधिक सक्रिय झाले आहेत. जनता सर्वच बाजूंनी सुरक्षित रहावी म्हणून दक्ष होत जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहेत. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून १५ डिसेंबर रोजी ट्विटरवर दोन पोस्टर शेअर केले आहेत. त्यामध्ये Cyber Defamation ( सायबर बदनामी ) पासून कसे वाचता येईल याबाबत माहिती दिली आहे. ते पोस्टर पहा.