साकुड येथे पत्त्याच्या क्लबवर छापा एएसपी कविता नेरकर यांच्या पथकाची कारवाई
अंबाजोगाई : तालुक्यातील साकुड येथे शेतात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर मंगळवारी ( दि. २५ ) रात्री उशिरा पोलीसांनी छापा टाकला. यामध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळताना आणि खेळविताना बारा जण मिळून आले. तसेच रोख रक्कम व वाहन, मोबाईल असा ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अंबाजोगाईच्या एएसपी कविता नेरकर यांच्या पथकाने केली.
साकुड येथे शेतात पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती एएसपी कविता नेरकर यांना मिळाली. त्यावरून नेरकर यांनी त्यांच्या पथकास कारवाईसाठी पाठवले.
साकुड शिवारातील दत्ता मानाजी शेप याच्या शेतातील पञयाच्या शेडमध्ये १ ) श्रीमंत साहेबराव गोरे रा.कारी ता . धारूर २ ) श्रीकृष्ण श्रीरामजी सोनी रा . ओमशांती अंबाजोगाई ३ ) जनार्धन कोडींबा उमाटे रा . पोखरी ता . अंबाजोगाई ४ ) विश्वनाथ रानबा दौंड रा . दौंडवाडी ता . परळी ५ ) बाळकृष्ण विठ्ठल लांडे रा . घाटसावळी ता बीड ६ ) नानासाहेब दत्ताजय कदम रा . घाटनांदुर ता . अंबाजोगाई ७ ) प्रकाश चव्हाण रा . घाटसावळी ता . बीड ८ ) ज्ञानोबा विठ्ठलराव तांदळे रा . सारडगांव , ता . परळी ९ ) गजानन माणिकराव आरोळे रा.डी.पी.एस. कॉलनी परळी ता . परळी १० ) संभाजी भानुदास शिंदे रा . नित्रुड ता . माजलगांव ११ ) संतोष तात्या केकाण रा . चौभारागल्ली अंबाजोगाई ता , अंबाजोगाई मिळून आले. हे तीन पत्ती तिर्रट नावाचा जुगार पैसे लावून खेळ खेळतांना व खेळवितांना मिळुन आले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. या छाप्यात रोख १ लाख ६९ हजार रुपयेसह मोबाईल चार चाकी वाहने, जुगाराचे साहित्य असा एकूण ५१ लाख १७ हजार ३५० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो.ना.तानाजी तागड यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई अंबाजोगाईच्या एएसपी कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चौधर , पो.ना. तानाजी तागड , बीट अंमलदार मोरे , शुभम राउत , नाना राऊत , शिनगारे , रामेश्वर सुरवसे , पठाण, देवकते , यांनी केली. बीड पोलीसांनी अवैध धंद्यार कारवाईचा बडगा उगारला असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सामान्य जनतेतून या कारवाईचे स्वागत करण्यात येत असून पोलीस प्रशासनाचे आभार मानले जात आहे.