सह शिक्षकाने शाळेतच चाकू दाखवून केली मुख्याध्यापकास मारहाण
आराम करण्यासाठी लायब्ररी चावी न दिल्याच्या रागातून घडलेला प्रकार

लोकगर्जना न्यूज
परळी : तालुक्यातील सिरसाळा येथे शिक्षकी पेशाला अशोभनीय घटना उघडकीस आली. सह शिक्षकाने आराम करण्यासाठी लायब्ररी चावी मागितली असता न दिल्याने राग आलेला चक्क शाळेतच चाकुचा धाक दाखवून मुख्याध्यापकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना न्यू हायस्कूल येथे घडली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्यालयात शिक्षिकांसोबत वेळापत्रक विषयी चर्चा करताना शाळेचा सहशिक्षक राम मुंडे हा कार्यालयात आला. आराम करायचा म्हणून लायब्ररीची चावी मागितली. चावी देण्यास नकार दिल्याने या रागातून कार्यालयातच शिवीगाळ सुरू केली. चाकु काढून धाक दाखवून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद मुख्याध्यापक विकास लाखे यांनी दिली. त्यावरून सिरसाळा पोलीस ठाण्यात सहशिक्षक राम मुंडे च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे हे करत आहेत. शाळेतच शिक्षक व मुख्याध्यापकात मारहाणीची घटना घडल्याने व एखाद्या गुंडाला लाजवेल असे चाकु दाखवून धमकावण्या पर्यंत हा प्रकार गेल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. असे शिक्षक लेकरांना काय संस्कार देतील? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.