क्राईम
सहशिक्षकांकडू भररस्त्यात मुख्याध्यापकाला मारहाण
लोकगर्जनान्यूज
बीड : मोठे पणाचा आव आणत सहशिक्षकांनी मुख्याध्यापकाला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना पाडषसिंगी येथे भर चौकात घडली. यामुळे शिक्षकी पेशाला या यांनी हरताळ फासल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
अंबादास मल्हारी नारायणकर मुख्याध्यापक जि.प. शाळा शेकटा असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शाळेतील दोन सह शिक्षकांनी मी खालच्या जातीचा असल्याने माझ्या हाताखाली काम करण्यास लाज वाटते म्हणून कट रचून पाडळसिंगी मारहाण केली. माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. जखमी असलेले मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांच्यावर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.