भवताली
सलग दहा तास मोफत रुग्णसेवा करून डॉ. आकाश बचुटे यांची आईला अनोखी श्रद्धांजली !

केज : साळेगाव ता केज येथील रहिवासी असलेले कान,नाक घसा तज्ञ डॉ. आकाश बचुटे यांनी आपल्या कळंब येथील हॉस्पिटल मध्ये सलग दहा तास मोफत रुग्ण सेवा करून दिवंगत आईच्या पुण्यसमरण दिनी श्रद्धांजली वाहिली.
उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे हे साळेगाव ता. केज येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या दिवंगत मातोश्री आशाबाई रावसाहेब बचुटे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिना निमित्त दि. २७ डिसेंबर सोमवार रोजी त्यांच्या कळंब येथील आशा हॉस्पिटलमध्ये मोफत एंडोस्कोपीक मशीनच्या सहाय्याने सलग दहा तास कान, नाक व घशाच्या विविध आजारांची तपासणी करून उपचार केले. केज, कळंब, अंबाजोगाई, धारूर, येरमाळा, वाशी, भूम येथील रुग्णांनी याचा लाभ घेतला