सर्वाधिक निधी खेचून आणणाऱ्या आमदार नमिता मुंदडा
पाच वर्षात मतदारसंघात सुमारे दोन हजार कोटींची विकास कामे!
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : केजच्या आमदार नमिता मुंदडा यांना भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली असून, मतदार संघात केलेल्या विकास कामामुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. यामधून लोकांसाठी मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या असून, मतदार संघात सर्वाधिक निधी आणणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये त्यांचा पहिला क्रमांक लागतो.
बीड मधील सहा विधानसभा मतदारसंघापैकी केज हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व आमदार नमिता मुंदडा करतात. गेल्या पाच वर्षांमध्ये नमिता मुंदडा यांनी नवीन असूनही मतदार संघासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणला आहे. लोकांच्या आरोग्याची व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, वीज, पाणी याची व्यवस्था असेल या मूलभूत बाबींचा विकास त्यांच्या माध्यमातून झाला आहे. मेडिकल कॉलेजच्या बांधकामासह इतर मशनरी साठी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. अंबाजोगाई येथे असलेल्या या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल परिसरातील जनतेचे आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे याचा विकास होणे आवश्यक असल्याने यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी प्रयत्न केले आणि या विभागाचा विकास होणे आवश्यक होते तो भाग विकसित केला. याशिवाय मतदारसंघातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि ते विस्तारित करण्यासाठी नमिता मुंदडा यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. अंबाजोगाईतील अंतर्गत रस्ते, केज शहरातील अंतर्गत रस्ते यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून रस्त्यांचा विकास करून घेतला. मतदारसंघात असलेल्या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागासाठी रस्ते अत्यंत महत्त्वाची होती या महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्याने आज हे रस्ते चांगल्या पद्धतीने लोकांसाठी रहदारीसाठी उपलब्ध आहेत. या शिवाय न्यायालयाची इमारत, इतर शासकीय इमारतीची कामे यासाठीही निधी उपलब्ध करण्यात आला. नमिता मुंदडा यांनी इतरांसारखे नुसतीच बडबड करण्यापेक्षा थेट विकास कामे केली आहेत. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये त्या विरोधी पक्षात होत्या त्यावेळी सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध केला मात्र सत्तेत आल्यानंतर या निधीमध्ये आणखी वाढ झाली आणि विकास कामांची गती वाढली. मतदार संघातील लोकांच्या विकास कामासोबतच त्यांच्या वैयक्तिक आणि अडचणीला मदत करणे अशी त्यांच्या कामाची पद्धत असल्याने त्या लोकप्रिय आमदार झाल्या आहेत. त्यांची लोकप्रियता बघूनच भाजपने त्यांचा पहिल्याच यादीत समावेश केला आणि अधिकृतपणे त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली. जिल्ह्यामधून त्या पहिल्याच अशा उमेदवार आहेत ज्यांची अधिकृत घोषणा झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्या बाजी मारतील कारण त्यांच्यापेक्षा त्यांची विकास कामेच बोलत आहेत.