लोकगर्जनान्यूज
बीड : फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील सागर बंगल्यावर जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परंतु भांबेरी येथे सभाजाने थांबवले येथे काही वेळ थांबून नंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांतता राखण्याचे तसेच राज्याती सर्व मराठा समाजाने पर आपापल्या घरी परतण्याचे आवाहन केले. स्वतः पाटील ही भांबेरी येथून काही वेळापूर्वी आंतरवली सराटीत दाखल झाले. आज ५ वाजता सहकार्यांची बैठक घेऊन त्यात पुढील दिशा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून एन्काऊंटर अथवा सलाईन मधून विष देऊन मला संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचा गंभीर आरोप करत माझा बळी पाहिजे का? मी सागर बंगल्यावर येतो म्हणत रविवारी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते होते. ही बातम्या राज्यात वाऱ्यासारखी पसरली अन् राज्यभरातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला. परंतु १६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याने भांबेरी गावात समाजातील महिला,पुरुषांनी ताफा अडवून अगोदर उपचार घेण्याचे आणि मुंबईला न जाण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत तसेच कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन अंबड येथे संचार बंदी लागू केल्याने आपल्या जाता येणार नाही. तसेच आपल्याला कायद्याचे पालन करायचे आहे. मराठा समाजाने शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत तेथून आपापल्या घरी परतण्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील भांबेरी येथून परत आंतरवली सराटी येथे दाखल झाले.
मोठा पोलीस बंदोबस्त आंतरवलीत शुकशुकाट
कायदा सुव्यवस्थेचा विचार करून आंतरवली सराटी येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. जरांगे पाटील यांनीही येथे कोणीही थांबु नये असे आवाहन केल्याने गर्दीने फुलून गेलेले आंतरवली सराटीत शुकशुकाट दिसून आला.
आज ५ वाजता बैठकीची शक्यता
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या विचाराने मुंबईला न जाता मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटीत दाखल झाले. आंदोलन सुरू केले. पुढील दिशा ठरविण्यासाठी आज ५ वाजता जरांगे पाटील बैठक घेतली अशी शक्यता आहे. यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.