समृध्दी महामार्गावर अपघातात केजचा तरुण ठार
लोकगर्जनान्यूज
केज : येथील तरूण आयशर टेम्पोमध्ये ढोबळी मिरची घेऊन जाताना समृध्दी महामार्गावर अपघातात होऊन चालक असलेला तरुण जागीच ठार झाला. ही माहिती मिळताच केज येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. आयशर टेम्पो आत्ताच घेतला असून हा पहिलाच भाडा असल्याची चर्चा आहे.
सय्यद अफताब हमीद ( वय 29 वर्ष ) रा. केज असे मयत तरुणाचे नाव असून, यांनी आत्ताच आयशर टेम्पो क्र. एम.एच. 44 यू 2807 घेतला आहे. याला पहिला भाडा मिळाल्याने अफताब यांनी लिंबागणेश ( बीड ) येथून सिमला ( ढोबळी ) मिरची घेऊन जबलपूर कडे जाताना वर्धा पासून जवळच समृध्दी महामार्गावर पुलाच्या कठड्याला धडक लागून अपघात झाला. या धडकेत आयशर टेम्पोच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. यामध्ये अडकून चालक सय्यद अफताब यांचा जागीच मृत्यू झाला. घठनेची माहिती मिळताच मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आहे.