सदैव साहेबांसोबत आमदार संदीप क्षीरसागरांची फेसबुक पोस्ट

लोकगर्जनान्यूज
बीड : आजच्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते आमदार कोणासोबत ही चर्चा रंगली आहे. सर्वांना सत्ता सुंदरी प्रिय असताना बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी “सदैव साहेबांसोबत” अशी सूचक फेसबुक पोस्ट केली असल्याने ते मोठ्या पवारांसोबत रहाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
पक्ष, तत्व, विचार, इमानदारी हे सत्तेपुढे फिके असून, कधी कोणता पुढारी व पक्ष एक दुसऱ्याच्या गळ्यात हात घालुन मिरवंल याचा नेम नाही. यामुळेच की,काय? राजकारणी कधीच कोणाचे शत्रू अथवा मित्र नसतात असे म्हटले जाते. ज्या राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत गाडीभरुन पुरावे असल्याचे सांगितले जात होते त्याच भाजपाने आज राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत समावून घेतलं आहे. अनेकांनी अजित पवारांच्या सोबत जाऊन शरद पवार म्हणजे मोठ्या पवारांची सात सोडली आहे. सत्ता सुंदरी सर्वांशा प्रिय असल्याने सत्तेकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असणार? परंतु हा आकडा नेमका अद्याप स्पष्ट झालेला नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या ५८ आमदार पैकी अजित पवारांकडे कोण आणि शरद पवार यांच्याकडे कोण? याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहेत. या परिस्थितीत सर्व शांत असताना बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी “सदैव साहेबांसोबत” अशी सूचक फेसबुक पोस्ट केली. ही पोस्ट म्हणजे आमदार क्षीरसागर यांची भूमिका समजली जात असून ते मोठ्या पवारांसोबत रहाणार हे स्पष्ट झाले. ही पोस्ट जनतेला आवडली असल्याची दिसून येत असून, तासभरात या पोस्टला ४.७ के लाइक अन् ४६८ कमेंट असून त्यातील सर्वाधिक आमदार क्षीरसागर यांच्या भूमिकेशी सहमत असल्याची आहेत.