सत्ताधारी,विरोधकांच एकमत; ओबीसी वगळून निवडणूका नकोच सर्वानुमते ठराव संमत
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी वगळून घेण्यात येऊ नये, यावर राज्यातील सत्ताधारी व विरोधकांचे एकमत असून, राज्य निवडणूक आयोगाला अशी शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याचे निवडणूक आयोग ओबीसी आरक्षण विना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याची तयारी सुरु केली . ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नकोच अशी मागणी ओबीसी समाजातून करण्यात येत आहे. याबाबत सरकारवर दाबव वाढत आहे. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी वगळून निवडणूका नकोच अशी शिफारस निवडणूक आयोगाला करण्याचा ठराव मांडला. यास विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिले. हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.तसेच विधानपरिषदेत ही हा ठराव ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडला दोन्ही सभागृहात हा ठराव संमत करण्यात आला.