सकारात्मक! ॲम्ब्युलन्स पडली अचानक बंद….नागरिकांनी ढकलून पोहचवल्याने वाचलं रुग्णाचा जीव
लोकगर्जना न्यूज
एक अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाताना ॲम्ब्युलन्स अचानक बंद पडली… अता काय? घडणारं म्हणून नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. घटनास्थळी उपस्थित तरुणांच्या हे लक्षात येताच त्यांनी धक्का ( ढकलून ) देत दवाखान्यात पोचवली. वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णाचा जीव वाचला आहे. या दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक करण्यात येत असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
हा व्हिडिओ सोलापूर येथील असून दोन दिवसांपपूर्वीची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. मोहळ येथून एक गंभीर रुग्ण घेऊन सदरील ॲम्ब्युलन्स ( रुग्णवाहिका ) सोलापूर येथे आली. अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ॲम्ब्युलन्स बंद पडली. चालकाने सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले परंतु ती काय सुरू होईना, बंद पडल्याचे कारणही चालकाला समजत नव्हते. रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने उपचार नाही मिळाले तर? या विचाराने नातेवाईकांनी रडण्यास सुरुवात केली. रडण्याचे आवाज ऐकून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी चौकशी केली असता रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून, ॲम्ब्युलन्स सुरू होत नाही असे समजले. मग काय नागरिक व तरुणांनी माणुसकी दाखवून चक्क ॲम्ब्युलन्स ढकलण्यास सुरू केली. धक्का देत दवाखान्याच्या दिशेने घेऊन जाताना अनेकांनी पाहून त्यांनाही मदत केली. यानंतर एका रिक्षावाल्याने धक्का देत ॲम्ब्युलन्स आधार रुग्णालयात पोहचवली. रुग्णाला अतिदक्षता ( आयसीयू ) मध्ये दाखल करून उपचार सुरू केले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. प्रसंगावधान दाखवून तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत ॲम्ब्युलन्स दवाखान्यापर्यंत पोचवली त्यामुळे वेळेत रुग्णाला उपचार मिळाल्याने जीव वाचला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.