संकटकाळात मदतीला धावणाऱ्या मुंदडांची निवडणूक सामान्य माणसाने घेतली हातात
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : संकट कोणतेही असो एक फोन केला मुंदडा कुटुंब मदतीसाठी धावून येतो. यामुळे सामान्यांची सेवा फक्त हेच कुटुंब करु शकतो म्हणून सर्वसामान्य माणसांनी मुंदडांची निवडणूक हातात घेतली असल्याने आमदार नमिता मुंदडा पुन्हा केज मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व करणार असल्याचे दिसून येत आहे.
वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सामाजिक कोणतीही अडचण असू द्या, मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला की, त्याच्या मदतीसाठी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, आमदार नमिता मुंदडा हे धावून येतात. त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात. यासाठी ते आपला, की विरोधक, त्याचा धर्म,जात कोणती हे न पहाता माणूस हीच जात माणून त्याची अडचण सोडवण्यासाठी हे कुटुंब तत्पर असतोच. हे केवळ लिहण्यासाठी किंवा बोलण्यासाठी नसून याचा अनुभव मतदारसंघातील ९० टक्के जनतेला आहे. तर मतदारसंघातील लोकांना याचा अनुभव आहे. मतलबा शिवाय कोणी जवळचा नातेवाईक आज मदत करेल याची खात्री नसतानाही निस्वार्थीपणे मुंदडा कुटुंब सर्वसामान्य माणसाची सेवा करीत आहे. यामुळे या कुटुंबाचे आणि मतदारसंघाचे नाते हे एका परिवारासारखे आहे. यामुळे पुन्हा आमदार नमिता मुंदडा यांनाच विधानसभेच्या सभागृहात पाठविण्याचा संकल्प करुन मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी मुंदडांची निवडणूक हातात घेतली आहे. यामुळे आमदार मुंदडा याच केजचे नेतृत्व विधानसभेत करणार असे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.